औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं, आंदोलन, मोर्चे असं सगळं काही पाहायला मिळालं, हे वातावरण शांत होत नाही तोच, पुन्हा एकदा औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं, यावेळी 'सामना' रंगला आहे तो अमित शाहा आणि संजय राऊतांमध्ये, इतकंच नव्हे तर अमित शाहांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा दावा संजय राऊतांनी केला, पाहुया याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट
शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर पोहोचले.... आणि तिथून त्यांनी भाषण केलं... पण अमित शाहांच्या याच भाषणातील मुद्द्यांचे बाण करुन संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं... पहिला प्रहार होता तो अमित शाहांनी केलेल्या शिवरायांच्या नामोल्लेखावरुन... तर दुसरीकडे अमित शाहांनी औरंगजेबाच्या कबरीचा समाधी म्हणून उल्लेख केल्याच्या वक्तव्यावरुही राऊतांनी टीकास्त्र डागलं... अमित शाहांच्या याच कार्यक्रमात छत्रपतींच्या सातारा गादीचे वारसदार खा. उदयनराजेंना आमंत्रण होतं पण कोल्हापूर गादीचे वारसदार खा. शाहू छत्रपतींना मात्र बोलावणं न आल्यानं राऊतांनीही यावरुनही सवाल केले....